शनिवार, २४ एप्रिल, २०१०
शनिवार, १७ एप्रिल, २०१०
बेलाग सालोटा किल्ला
नाशिक जिल्ह्यातील सटाणे तालुक्यामध्ये असलेल्या साल्हेर किल्ल्याच्या शेजारीच सालोट्याचा किल्ला आहे. साल्हेर गडाचा सोबती आणि उपदुर्ग असलेला सालोटा किल्ला दुर्गम आणि बेलाग आहे. सालोटा किल्ल्याचा उल्लेख काही ठिकाणी सालुता असाही करतात.
साल्हेर किल्ल्याच्या भटकंती दरम्यान याही किल्ल्याला भेट देणे सोयीचे ठरते. सालोट्याला जाण्यासाठी सटाणे-तिळवण मार्गे महारजर या छोट्याशा वाडीजवळ पायउतार व्हावे लागते. अथवा सटाणे ताहराबाद-मुल्हेरमार्गे वाघांबे गाठून साल्हेर-सालोट्याच्या खिंडीमध्ये यावे लागते.
महारजर गावाकडून साल्हेर-सालोट्याच्या मधील खिंड दिसते. मधल्या नाळेच्या वाटेने या खिंडीपर्यंत पोहोचेपर्यंत चांगलीच दमछाक होते. या मार्गावर पाणी नसल्याने पाणी तसेच खाण्याचे पदार्थ सोबत असणे गरजेचे ठरते.
खिंडीतून पश्चिमेकडे साल्हेर गडावर जाणारा धोपटमार्ग आहे. सरळ उत्तरेकडे जाणारी वाट वाघांबे गावाकडे जाते. सालोटा किल्ल्यावर येणार्या पर्यटकांचे प्रमाण अतिशय कमी असल्यामुळे किल्ल्याची वाट फारशी रुळलेली नसते. साल्हेर-सालोटा खिंडीमधून सालोटा किल्ल्याचा माथा डावीकडे ठेवून आपण पूर्वेकडे आडवे चालत निघतो. साधारण अर्धामाथा ओलांडल्यावर थांबून माथ्याचे निरीक्षण केल्यावर डावीकडे कातळामध्ये याचा दरवाजा दिसतो. दरवाजाच्या पुढे काही अंतरावरुन कातळात कोरलेल्या काही पायर्या दिसतात. याच मार्गाने आपल्याला गडावर चढायचे आहे. या पायर्यांच्या खालच्या भागातील पायर्या मातीने बुजतात तसेच तिथपर्यंत जाण्याचा मार्गही घसार्याचा असल्याने काळजीपूर्वक चढाई करावी लागते.
गडाच्या माथ्यावर घरांची जोती पहायला मिळतात. सालोट्यावरुन आजुबाजूचा मोठा परिसर पहायला मिळतो. गुजराथमधील डांगचा परिसरही दिसतो. डांगमधील पिंडवलचा किल्ला तसेच विलासन हिलवरील छत्रीही स्वच्छ वातावरणामध्ये पहायला मिळते. अर्थात साल्हेरचे रौद्ररुप मात्र मनाचा ठाव गाठते यात शंका नाही.
गुरुवार, १५ एप्रिल, २०१०
मी मराठी
महाराष्ट्राचे काश्मीर महाबळेश्वर
महाराष्ट्रातील काश्मीर असे महाबळेश्वरचे वर्णन केले जाते. सातारा जिल्हयात महाबळेश्वर सह्याद्रीच्या कुशीत वसले आहे. निसर्गरम्य व थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरचा लौकिक आहे. महाबळेश्वर इंग्रजांच्या काळात मुंबई प्रांताची उन्हाळ्यातील राजधानी होते.
येथे सुमारे 30 ठिकाणे बघण्यासारखी आहेत.एलफिस्टन पॉईट, विल्सन पॉईंट, आर्थर पाईंट, लॉडनिंग पॉईंट, माजोरी पॉईंट नाथकोट, बॉंम्बे पाईंट, सावित्री पाईंट कर्निक पाईंट फाकलेड पॉईंट हे काही पॉईंट प्रसिद्ध आहेत.
या पॉईंटवर जाऊन सूर्यास्त पाहण्याची मजा काही वेगळीच.महाबळेश्वरचे पठार जवळपास 150 किलोमीटरमध्ये व्यापले आहे. समुद्रसपाटीपासून ते 4710 फुट उंचीवर आहे. येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात.
महाबळेश्वर हे धार्मिक क्षेत्र म्हणूनही प्रसिध्द आहे. शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा काढला तो प्रतापगड येथून जवळ आहे. पाचगणी हे आणखी एक थंड हवेचे ठिकाणही पाहण्यासारखे असून तेही येथून जवळ आहे. महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरीही जगप्रसिध्द आहे. थंडीत स्ट्रॉबेरी खाण्याचा आनंद काही औरच आहे.
जाण्याचा मार्ग -
महाबळेश्वर पुण्यापासून 120, मुंबईहून 247 औरंगाबादहून 348 तर पणजी पासून 430 किलोमीटरवर आहे.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)