शनिवार, १ नोव्हेंबर, २०१४

मुंबई (आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती: /'mumbəi/ उच्चार ऐका) (Bombay-बंबई) ही भारतातल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. मुंबई हे भारतातील सर्वांत श्रीमंत शहर असून दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. मुंबई शहराला नैसर्गिक बंदर लाभले असून या बंदरातून सागरी मार्गाने होणारी भारताची ५०% मालवाहतूक होते.
मुंबई १८व्या शतकाच्या मध्यकाळात ब्रिटिशांद्वारे सात बेटांना जोडून बनविण्यात आली. १९व्या शतकात आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि २०व्या शतकामध्ये स्वतंत्रता चळवळीचा पाया मुंबईतच मजबूत झाला. इ.स. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळताना मुंबई शहर हे ब्रिटिशांनी बनविलेल्या मुंबई इलाख्यातच राहिले. इ.स. १९६० साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व मुंबई या नवीन राज्याचीही राजधानी बनली. १९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता असताना या शहराचे नाव अधिकृतपणे बॉम्बे पासून मुंबई करण्यात आलं.
मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. रिझर्व बँक, मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार या महत्त्वाच्या आर्थिक संस्था या शहरात आहेत. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भागातून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत येतात.
मुंबई हे बॉलीवूड व मराठी उद्योगाचे केंद्र आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईच्या हद्दीतच आहे व असा योग खूप कमी शहराच्या बाबतीत आहे.
https://www.youtube.com/watch?v=QDD3VjJ1ax0https://www.youtube.com/watch?v=QDD3VjJ1ax0