सातारा जिल्ह्याच्या
- पूर्वेस - सोलापूर जिल्हा,
- पश्चिमेस - रत्नागिरी जिल्हा,
- उत्तर-पश्चिमेस- रायगड जिल्हा,
- उत्तरेस- पुणे जिल्हा व
- दक्षिणेस- सांगली जिल्हा आहेत.
- सातारा जिल्ह्याच्या पूर्वेस असणारी सह्याद्री पर्वताची रांग त्याला कोंकणापासून अलग करते
- सातारा जिल्ह्यातील एकूण ११ तालुके असून पुढीलप्रमाणे
सातारा, कराड ,वाई ,महाबळेश्वर ,फलटण ,माण, खटाव, कोरेगांव पाटण, जावळी, खंडाळा
क्र तालुका क्षेत्रफळ (चौ. कि. मी.) लोकसंख्या १ महाबळेश्वर ३७८.९ ५४,५४६ २ वाई ६२२.६ १,८९,३३६ ३ खंडाळा ६००.२ १,१९,८१९ ४ फलटण १,१७९.६ ३,१३,६२७ ५ माण १,६०८.२ १,९९,५९८ ६ खटाव १,३७४.० २,६०,९५१ ७ कोरेगाव ९५७.९ २,५३,१२८ ८ सातारा ९५३.५ ४,५१,८७० ९ जावळी ८६९.० १,२४,६०० १० पाटण १,४०७.८ २,९८,०९५ ११ कर्हाड १,०८४.८ ५,४३,४२४ पर्यटन
सज्जनगड :-साताऱ्याजवळील सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे
प्रतापगड
शिखर शिंगणापूर-शंभू-महादेवाचे येथील मंदिर राज्यात प्रसिद्ध
औंध :-वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहे डोंगरावर यमाई देवीचे मंदिर आहे
महाबळेश्वर व पाचगणी :-भारतातील सुप्रसिद्ध थंड हवेची ठिकाणे सातारा जिल्ह्यात आहेत
अजिंक्यतारा किल्ला ,कास तलाव ,कोयना प्रकल्प ,
ठोसेघर धबधबा